चुन्याचा घाणा...



                                                                                                                                                      


आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गडकोटांवर फिरत असताना त्यावरील बुरुज, तटबंदी, इमारतींचे बांधकाम बघून अचंबीत होऊन जातो. बऱ्याच गडांवर फेरफटकामारताना आपल्याला दिसणाऱ्या अवशेषांमध्ये एक दगडी गोलाकार वर्तुळ आणि त्यात भला मोठ्या जात्याच्या आकाराचा एक दगड दिसतो. त्यालाच चुन्याचा घाणा असं म्हणतात.


चुन्याचा घाणा म्हणजे, दगडांचे वर्तुळ ज्यात भल्यामोठ्या दगडी जात्याला बैलांच्या सहाय्याने फिरवले जाई.घाण्याचा साहाय्याने चुन्याचे जे मिश्रण तयार होई त्याचा उपयोग गडवरील सर्व बांधकामांसाठी केला जाई




पूर्वीच्या काळी गडावरील बांधकामासाठी चुन्याचा वापर होत असे, त्याचे कारण म्हणजे चुन्याचे गुणधर्म आणि उपलब्धतता. नैसर्गिकरित्या उपलब्ध असणाऱ्या चुनखडीवर थोडी प्रक्रिया करून भट्टी मधून काढल्या नंतर चुनखडीची पूड तयार होते, ह्या पूडी मध्ये जास्त प्रमाणात पाणी, भाताचे तूस, गूळ, बारीक वाळू ह्यांचे मिश्रण घाण्यावर घोटले जाई.

चुन्याची नैसर्गिकरित्या होणारी उपलब्धता, चुना सावकाश घट्ट होत असल्यामुळे बांधकामाला तडे जाण्याची कमी शक्यता, तसेच चुना उष्णता रोधक असल्यामुळे मिळणारा गारवा असे बरेच फायदे असल्यामुळे चुन्याचा वापर मोठ्याप्रमाणात केला जाई.



आजही काही गडांवर असे चुन्याचे घाणे पाहायला मिळतात. तिकोना, रोहिडा, केंजळगड, प्रतापगड, अजिंक्यतारा माणिकगड, विसापूर, विजयदुर्ग, अश्या गडांवरील चुन्याचे घाणे आजही सुस्थितीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

सोलो एकदिवसीय मोहीम...

कातळकोरीव हडसर...