सोलो एकदिवसीय मोहीम...
सोलो एकदिवसीय मोहीम - कात्रज-सिंहगड-राजगड-तोरणा ( KSRT )- 8 सप्टेंबर 2019 मी कात्रज-सिंहगड-राजगड-तोरणा(KSRT) हा अल्ट्रा माऊंटन ट्रेल रन एका दिवसात पूर्ण केला, एकूण 64 किमी अंतर मी 23:30 तासांमध्ये पूर्ण केलं. 8 तारखेला पहाटे 12 ला कात्रज बोगद्यावरून सुरवात करून 8 तारखेला रात्री 11.30 ला तोरणा सर केला ...सुरवातीला वाटलं की एवढ्या पावसात हे धाडस नको करायला, काही मित्रांनी पण सल्ला दिला की नको जाऊ आणि एकटा तर नकोच..! मनात थोडी धाकधूक होतीच. पूर्ण ट्रेक सोलो करायचा होता ना..! पण मनात निर्णय झाला होता, 15 दिवसांपासून नियोजन चालू होतं, बॅकअप म्हणून राजकुमार दादा आणि सविता मॅडम वेल्हे ला येऊन थांबणार होते, आणि ह्या आधी असे लांब पल्ल्याचे ट्रेल एका दिवसात करायचा अनुभव पण होता. पण ते सगळे ग्रुप मध्ये केलेले .(K2S)कात्रज ते सिंहगड आता पर्यंत 30 वेळा केलेला असल्यामुळे रूट चांगला माहिती होता, पुढे सिंहगड ते राजगड रूट ची माहिती एका मित्राकडू घेतली, मॅप आणि त्याने केलेल्या रूट चा थोडा अभ्यास करून घेतला, राजगड ते तोरणा आधी केला असल्यामुळे तेथे पण काही अडचणी...