अलंग,मदन आणि कुलंग (AMK)- एक दिवसीय मोहीम.
एखादा इझी ग्रेड ट्रेक २०-२५ जणांना घेऊन करणे हे एक वेळ तसं सहज शक्य आहे आणि असे करणारे काही लोक, ग्रुप्स आपल्या आसपास दिसतीलही. पण अलंग,मदन आणि कुलंग सारखे तीन अवघड किल्ले एका दिवसात एवढ्या सगळ्यांकडुन करुन घेणे हे किंचित अशक्यच! अशा अशक्यप्राय गोष्टी तडीस नेण्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे ठरवलेल्या ध्येयावर प्रचंड प्रेम आणि निष्ठा. प्रेरणेने, ध्येयाने झपाटलेले असल्याशिवाय अशा गोष्टी पूर्णत्वास जात नाहीत. अरुण सर आम्हाला जेव्हा एखादी योजना सांगतात तेव्हा ती सुरवातीला नक्कीच यापूर्वी पूर्ण झालेल्या मोहीमा आणि योजनांपेक्षा पेक्षा जास्त आव्हानात्मक वाटते. मात्र परफेक्ट प्लॅनिंग करूनच ते मैदानात उतरतात! कुठलीही मोहीम आखताना आणि ती प्रत्यक्षात उतरवताना जेव्हा आपण अनुभवी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, योग्य पाहणी करून, पूर्वनियोजित अभ्यास करून त्याची योजना आखतो, रोज प्रॅक्टिस किंवा सराव करतो तेव्हा अपयश आपल्या आसपासही फिरकणार नाही हे नक्की! २६ जानेवारी २०१९ ला ही एक दिवसीय मोहीम पुर्ण केली. त्यांच्या isolation zone तर्फे ही AMK ची एकदिवसीय मोहिम आखली होती आणि मी त्या मोहिमेचा सदस्य होत...