Posts

Featured post

कात्रज-सिंहगड-कात्रज

Image
 SRT  अल्ट्रानंतर 2 आठवडे आरामच झाला, पायाला दुखापत झाल्यामुळे शर्यत अर्धवट सोडावी लागली होती. रोज थोडा व्यायाम आणि स्ट्रेचिंग मुळे पायांची रिकव्हरी लवकर झाली. आणि मग ह्या आठवड्यात काय करायचं हा विचार सुरू झाला, दोन तीन प्लॅन करून विस्कटल्यानंतर माझा आवडीचा K2S करायला एकटाच जायला निघालो... भालेराव सर आणि त्यांच्या सोबतचे नगरकर मंडळी K2S ला येणार होते पण ऐनवेळी प्लॅन बदलला आणि ते सिंहगडावर गेले.  11.30 ला जुन्या बोगद्यातून वाघजाई देवीच्या मंदिरावळ आलो, मंदिराजवळ गावातील काही मंडळी देवीच्या प्रसादाची तयारी करत होते. मंडळी बोलली आता उन्हात कुठं जाता भाऊ...  प्रसाद होतोय थांबा, खाऊन निवांत ऊन उतरलं की जा...  स्ट्रेचिंग करून मी दुपारी बरोबर 12 वाजता उन्हाच्या पाऱ्यात वाघजाई देवीच्या मंदिराजवळून ट्रेक सुरू केला.  SRT अल्ट्रा ची प्रॅक्टिस करत असताना स्ट्रेचिंगचे किती फायदे होतात ह्याचा अनुभव आलाय. जवळ जवळ सहा महिन्यांनंतर K2S करत होतो, त्यात सुर्यदेवमहाराज डोक्यावर आलेले, आणि पूर्ण रूट वर एकटाच...  हा ट्रेक जसा तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस पाहतो तसंच तुमच्या म...

अलंग,मदन आणि कुलंग (AMK)- एक दिवसीय मोहीम.

Image
एखादा इझी ग्रेड ट्रेक २०-२५ जणांना घेऊन करणे हे एक वेळ तसं सहज शक्य आहे आणि असे करणारे काही लोक, ग्रुप्स आपल्या आसपास दिसतीलही. पण अलंग,मदन आणि कुलंग सारखे तीन अवघड किल्ले एका दिवसात एवढ्या सगळ्यांकडुन करुन घेणे हे किंचित अशक्यच! अशा अशक्यप्राय गोष्टी तडीस नेण्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे ठरवलेल्या ध्येयावर प्रचंड प्रेम आणि निष्ठा. प्रेरणेने, ध्येयाने झपाटलेले असल्याशिवाय अशा गोष्टी पूर्णत्वास जात नाहीत. अरुण सर आम्हाला जेव्हा एखादी योजना सांगतात तेव्हा ती सुरवातीला नक्कीच यापूर्वी पूर्ण झालेल्या मोहीमा आणि योजनांपेक्षा पेक्षा जास्त आव्हानात्मक वाटते. मात्र परफेक्ट प्लॅनिंग करूनच ते मैदानात उतरतात!  कुठलीही मोहीम आखताना आणि ती प्रत्यक्षात उतरवताना जेव्हा आपण अनुभवी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, योग्य पाहणी करून, पूर्वनियोजित अभ्यास करून त्याची योजना आखतो, रोज प्रॅक्टिस किंवा सराव करतो तेव्हा अपयश आपल्या आसपासही फिरकणार नाही हे नक्की!  २६ जानेवारी २०१९ ला ही एक दिवसीय मोहीम पुर्ण केली. त्यांच्या isolation zone तर्फे ही AMK ची एकदिवसीय मोहिम आखली होती आणि मी त्या मोहिमेचा सदस्य होत...

चुन्याचा घाणा...

Image
                                                                                                                                                       आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गडकोटांवर फिरत असताना त्यावरील बुरुज, तटबंदी, इमारतींचे बांधकाम बघून अचंबीत होऊन जातो. बऱ्याच गडांवर फेरफटकामारताना आपल्याला दिसणाऱ्या अवशेषांमध्ये एक दगडी गोलाकार वर्तुळ आणि त्यात भला मोठ्या जात्याच्या आकाराचा एक दगड दिसतो. त्यालाच चुन्याचा घाणा असं म्हणतात. चुन्याचा घाणा म्हणजे, दगडांचे वर्तुळ ज्यात भल्यामोठ्या दगडी जात्याला बैलांच्या सहाय्याने फिरवले जाई.घाण्याचा साहाय्याने चुन्याचे जे मिश्रण तयार होई त्याचा उपयोग गडवरील सर्व बांध...

सोलो एकदिवसीय मोहीम...

Image
सोलो एकदिवसीय मोहीम - कात्रज-सिंहगड-राजगड-तोरणा ( KSRT )- 8 सप्टेंबर 2019            मी कात्रज-सिंहगड-राजगड-तोरणा(KSRT) हा अल्ट्रा माऊंटन ट्रेल रन एका दिवसात पूर्ण केला, एकूण 64 किमी अंतर मी 23:30 तासांमध्ये पूर्ण केलं. 8 तारखेला पहाटे 12 ला कात्रज बोगद्यावरून सुरवात करून 8 तारखेला रात्री 11.30 ला तोरणा सर केला ...सुरवातीला वाटलं की एवढ्या पावसात हे धाडस नको करायला, काही मित्रांनी पण सल्ला दिला की नको जाऊ आणि एकटा तर नकोच..! मनात थोडी धाकधूक होतीच. पूर्ण ट्रेक सोलो करायचा होता ना..! पण मनात निर्णय झाला होता, 15 दिवसांपासून नियोजन चालू होतं, बॅकअप म्हणून राजकुमार दादा आणि सविता मॅडम वेल्हे ला येऊन थांबणार होते, आणि ह्या आधी असे लांब पल्ल्याचे ट्रेल एका दिवसात करायचा अनुभव पण होता. पण ते सगळे ग्रुप मध्ये केलेले .(K2S)कात्रज ते सिंहगड आता पर्यंत 30 वेळा केलेला असल्यामुळे रूट चांगला माहिती होता, पुढे सिंहगड ते राजगड रूट ची माहिती एका मित्राकडू घेतली, मॅप आणि त्याने केलेल्या रूट चा थोडा अभ्यास करून घेतला, राजगड ते तोरणा आधी केला असल्यामुळे तेथे पण काही अडचणी...

कातळकोरीव हडसर...

Image
                    शिवनेरी, रायगड, राजगड, सिंहगड, जीवधन हे आपल्याला परिचित असे गडकोट ! पण हडसर, चावंड, सिंदोळा अशी नावे घेतली तर हे गड आहेत असे सांगूनही अनेकांचा विश्वास बसत नाही, आपल्या सह्याद्रीत असे अनेक गडकोट विखुरलेले आहेत. त्यांचाच मागोवा घेण्याचा हा प्रयत्न! पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आणि लेण्यांनी अतिशय समृद्ध आहे. जुन्नरच्या पश्चिमेला असणाऱ्या माणिकडोह धरणाच्या एका बाजूने अजनावळेमार्गे घाटघर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच हडसर गावात हा अनवट किल्ला आहे "हडसर"! जुन्नरपासूनचं अंतर १२ किमी असेल.खरतर या वाटेवर प्रवास करताना माणिकडोह धरण सोडलं की डोंगरांचा विळखा आपल्याबाजूला पडत जातो. पुन्हा पुन्हा या विळख्यात अडकायची इच्छा होत राहते. ह्या डोंगरांबद्दल कौतुक आणि गुढरम्यता वाटत राहते! याच भूगोलावर तर आमचा इतिहास घडला आहे. हडसर गावात उत्तुंग कड्याचं रूप घेत समोर हडसर किल्ला उभा राहतो. उंची तब्बल ३२०० फूट! या त्याच्या अवाढव्य दर्शनामुळेच तो अवघड आणि अश्यक्य वाटू लागतो; आणि म्हणूनच याला "पर्वतगड" अस अजून...