Posts

सोलो एकदिवसीय मोहीम...

Image
सोलो एकदिवसीय मोहीम - कात्रज-सिंहगड-राजगड-तोरणा ( KSRT )- 8 सप्टेंबर 2019            मी कात्रज-सिंहगड-राजगड-तोरणा(KSRT) हा अल्ट्रा माऊंटन ट्रेल रन एका दिवसात पूर्ण केला, एकूण 64 किमी अंतर मी 23:30 तासांमध्ये पूर्ण केलं. 8 तारखेला पहाटे 12 ला कात्रज बोगद्यावरून सुरवात करून 8 तारखेला रात्री 11.30 ला तोरणा सर केला ...सुरवातीला वाटलं की एवढ्या पावसात हे धाडस नको करायला, काही मित्रांनी पण सल्ला दिला की नको जाऊ आणि एकटा तर नकोच..! मनात थोडी धाकधूक होतीच. पूर्ण ट्रेक सोलो करायचा होता ना..! पण मनात निर्णय झाला होता, 15 दिवसांपासून नियोजन चालू होतं, बॅकअप म्हणून राजकुमार दादा आणि सविता मॅडम वेल्हे ला येऊन थांबणार होते, आणि ह्या आधी असे लांब पल्ल्याचे ट्रेल एका दिवसात करायचा अनुभव पण होता. पण ते सगळे ग्रुप मध्ये केलेले .(K2S)कात्रज ते सिंहगड आता पर्यंत 30 वेळा केलेला असल्यामुळे रूट चांगला माहिती होता, पुढे सिंहगड ते राजगड रूट ची माहिती एका मित्राकडू घेतली, मॅप आणि त्याने केलेल्या रूट चा थोडा अभ्यास करून घेतला, राजगड ते तोरणा आधी केला असल्यामुळे तेथे पण काही अडचणी...

कातळकोरीव हडसर...

Image
                    शिवनेरी, रायगड, राजगड, सिंहगड, जीवधन हे आपल्याला परिचित असे गडकोट ! पण हडसर, चावंड, सिंदोळा अशी नावे घेतली तर हे गड आहेत असे सांगूनही अनेकांचा विश्वास बसत नाही, आपल्या सह्याद्रीत असे अनेक गडकोट विखुरलेले आहेत. त्यांचाच मागोवा घेण्याचा हा प्रयत्न! पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आणि लेण्यांनी अतिशय समृद्ध आहे. जुन्नरच्या पश्चिमेला असणाऱ्या माणिकडोह धरणाच्या एका बाजूने अजनावळेमार्गे घाटघर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच हडसर गावात हा अनवट किल्ला आहे "हडसर"! जुन्नरपासूनचं अंतर १२ किमी असेल.खरतर या वाटेवर प्रवास करताना माणिकडोह धरण सोडलं की डोंगरांचा विळखा आपल्याबाजूला पडत जातो. पुन्हा पुन्हा या विळख्यात अडकायची इच्छा होत राहते. ह्या डोंगरांबद्दल कौतुक आणि गुढरम्यता वाटत राहते! याच भूगोलावर तर आमचा इतिहास घडला आहे. हडसर गावात उत्तुंग कड्याचं रूप घेत समोर हडसर किल्ला उभा राहतो. उंची तब्बल ३२०० फूट! या त्याच्या अवाढव्य दर्शनामुळेच तो अवघड आणि अश्यक्य वाटू लागतो; आणि म्हणूनच याला "पर्वतगड" अस अजून...